अमरावती ब्रेकिंग : आठ रुग्णांची भर; एकूण कोरोनाबधित 226 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

विदर्भातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासाठी चिंता वाढवणारी ठरणारी आहे. आजवर यवतमाळ आणि अमरावतीत रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, येथे अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. तसेच नागपुरातही मे महिन्यात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अमरावती : नागपूर व अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पहिल्या क्रमांकावर कोण राहणार जणू यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. यामुळे नागपूर व अकोला कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरले आहेत. आता यात अमरावती व यवताळ सहभागी होतो की काय, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. येथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अमरावतीत सोमवार उजाळत नाही तोच आणखी आठ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 226वर जाऊन पोहोचला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यातील आठ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले. यात दसरा मैदान, बुधवारा, चेतनदास बगीचा, मसान गंज व काकडा (ता. अचलपूर) येथील सहा पुरुषांचा तर बुधबारा येथील दोन महिलांचा यात समावेश आहे. काकडा येथील व्यक्ती मुंबई येथून 21 मे रोजी परतल्याचे समजते. ते परतल्यापासून संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यांना ताप आल्याने अमरावती येथे रेफर करण्यात आले. त्यांचा स्वॅब घेण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत संपर्क शोध व इतर तपास होत आहे. 

हेही वाचा - रस्त्यावर फिरत होत्या आठ तरुणी, पोलिसांनी विचारताच ऐकविली अंगावर काटा आणणारी आपबीती

विदर्भातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासाठी चिंता वाढवणारी ठरणारी आहे. आजवर यवतमाळ आणि अमरावतीत रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, येथे अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. तसेच नागपुरातही मे महिन्यात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अचानक वाढलेल्या मृत्यूमुळेही नागपुरात चिंता वाढली आहे. दुसरीकडे अमरावतीत नागपूरच्या तुलनेत जास्त मृत्यू झाले आहे. आता येथील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे अमरावती नागपूरची बरोबरी करणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati added eight patients