esakal | अमरावती जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अलर्ट, 'बर्ड फ्लू'चा संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना
sakal

बोलून बातमी शोधा

amravati animal husbandry department curative measures due to bird flu

मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाबसह इतर काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पशू तसेच पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अलर्ट, 'बर्ड फ्लू'चा संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : देशातील पंजाब, मध्य प्रदेश तसेच राजस्थानसह इतर काही राज्यांमध्ये मागील काही तासांत पशूंचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातसुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पशूसंवर्धन विभागाने विशेष काळजी करण्याचे कारण नसल्याचा दावा केला असला तरी संभाव्य धोका टाळण्याच्या उपाययोजनादेखील सुरू केल्या आहेत.

हेही वाचा - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरीत शोककळा; सरपंचांनाही...

मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाबसह इतर काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पशू तसेच पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशची सीमा अमरावती जिल्ह्याला लागूनच असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. पर्यायाने वरुड तसेच बैतुल मार्गाने होणारी पशूंच्या वाहतुकीबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नेमका आजार कोणता याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा - बापरे! २५ वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, मग आतापर्यंत कशी व्हायची संरपंचाची निवड?

पोल्ट्री व्यावसायिकांनी घाबरण्याचे कारण नाही -   
संबंधित आजार हा बर्डफ्लू असल्याबाबत कुठलेही पुरावे आतापर्यंत सापडलेले नाहीत. तरीदेखील आम्ही सावधगिरी बाळगत आहोत. जिल्ह्यात कुठेही बर्डफ्लू नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक तसेच नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपल्या परिसरात पक्षी मरून पडलेला आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी.
- डॉ. विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी. 
 

loading image