Amravati Crime News
esakal
अमरावती : जुन्या वैमनस्यातून मारहाण केल्यानंतर स्मशानभूमीजवळ नेऊन जखमीला जळत्या चितेवर फेकून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यात घडली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणात जखमी दुर्गाप्रसाद घनश्याम सिरसाम (वय ३०, रा. झोपडपट्टी, परतवाडा) यांच्या तक्रारीवरून संशयित कालू यादव (परतवाडा) यासह त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. एकास रविवारी (ता. १९) अटक करण्यात आली, असे परतवाड्याचे ठाणेदार अजय आकरे यांनी सांगितले. दुर्गाप्रसाद आणि कालू यादव हे दोघे एकमेकांच्या परिचित आहेत.