Amravati Crime
esakal
अमरावती, ता. २८ : बडनेरा रेल्वेस्थानकाजवळ एका लॉजच्या मागे किरकोळ वादातून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कुणाल विनोद तेलमोरे (वय १७, रा. तेलीपुरा, जुनीवस्ती, बडनेरा), असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती बडनेऱ्याचे ठाणेदार सुनील चव्हाण यांनी दिली.