Amravati | शहरात मोर्चे, मेळावे, मिरवणुकांना बंदी; 11 अटींची करावी लागणार पूर्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती शहरात मोर्चे, मेळावे, मिरवणुकांना बंदी; 11 अटींची करावी लागणार पूर्तता
अमरावती शहरात मोर्चे, मेळावे, मिरवणुकांना बंदी; 11 अटींची करावी लागणार पूर्तता

अमरावती शहरात मोर्चे, मेळावे, मिरवणुकांना बंदी; 11 अटींची करावी लागणार पूर्तता

अमरावती - शहरात उद्भवलेली परिस्थिती पूर्वपदावर येत असली तर, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिस आयुक्तांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय मोर्चे, मेळावे, मिरवणूकांना बंदी घालण्यात आली.

कुणालाही असे कार्यक्रम घेण्याची गरज भासल्यास उदा. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेल्या सर्व संस्था शैक्षणिक संस्था, खासगी व्यक्तींना सीपींकडे केलेल्या अर्जात 11 अटींची पूर्तता करण्याचे बंधन घालण्यात आले. संघटनेचे नाव, कार्यकारिणी, संस्थेचे कायदे, पोटकायदे, धर्मदाय आयुक्तांकडे सादर केलेली माहिती, लोकांना एकत्रित करण्यासाठी ठोस कारण द्यावे लागेल.

परवानगी नाकारल्यास त्यामुळे होणारी त्यांची हानी, जमाव जमण्याचे ठिकाण, त्यामालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, जमावात सामील होणाऱ्या लोकांचे संमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु त्यातच दुसऱ्या बाजूने या अटीतून राजकीय पक्ष, लग्न समारंभ व अंत्ययात्रा यांना मूभा देण्यात आली. असे सीपींच्या या आदेशात नमुद करण्यात आले. शिवाय रहदारीस अडथळा न होण्यासाठी आयोजकांनी नेमकी काय उपाययोजना केली याचे कारण सुद्धा आयोजकांना यापुढे आधीच सादर करावे लागेल.

हेही वाचा: निसर्ग संवर्धनात ‘प्रयासवन’ एक साधनाच : राज्यपाल कोश्यारी

नाहरकत प्रमाणपत्राची अट

सीपींकडे परवानगीसंदर्भात अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते अमरावती महापालिका किंवा जिल्हापरिषद यांचे नाहरकत प्रमाणपत्र, सहा.आयुक्त, शहर वाहतूक शाखा, संबंधित ठाण्याचे प्रभारी अशा यंत्रणेचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊनच सीपी निर्णय घेतील.

क्रिडास्पर्धांवरही गंडांतराचे सावट

क्रीडा विषयक सर्व स्पर्धा तसेच सार्वजनिक, खासगी ठिकाणी आयोजित होणारे सर्व मेळावे, रंगभूमिविषयक प्रयोग, पुस्तक प्रदर्शने व सेलही आता पोलिस परवानगीच्या कक्षेत आलेले आहे. संबंधितांना जबाबदार यंत्रणेच्या 11 अटींची पूर्तता करावी लागेल.

आदेश निर्गमित झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत राजकीय पक्ष, संस्था, व्यक्तींना आपले आक्षेप व हरकती पोलिसांच्या ई-मेल, वेबसाइट, ट्विटरवर ऑनलाइन नोंदविण्याची मूभा आहे.

- डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती

loading image
go to top