अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा

Amravati Corona infected woman dies
Amravati Corona infected woman dies

अमरावती : स्थानिक राहुलनगर बिच्छूटेकडी येथील कोरोनाबाधित 50 वर्षीय महिलेचा सोमवारी (ता. आठ) कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर किशोरनगर येथील 35 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. शहरात दररोज एक-दोन नव्या परिसराची भर पडत आहे. आजच्या मृत्यून एकूण मृतांची संख्या 17 झाली आहे. 

सारीच्या आजाराची रुग्ण असलेल्या 50 वर्षीय महिलेस डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन जूनला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने तेथून रविवारी (ता. सात) जिल्हा कोविड रुग्णालयात हालविण्यात आले. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी पहाटे चारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. यासोबतच जिल्ह्यात कोरोना संक्रमणाने मृतांची संख्या झालेली आहे.

संबंधित महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. मृत महिलेच्या पश्‍चात तिघांपैकी एक मुलगा पोलिस आहे. संबंधित महिलेचा दफनविधी करण्यात आला. तिच्या कुटुंबातील सदस्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करून संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. 

किशोरनगर येथील कोरोना बाधित आढळली 36 वर्षीय महिला रुक्‍मिणीनगर येथील खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. या रुग्णालयात आतापर्यंत तीन परिचारिका, सुरक्षारक्षक, त्यांचे नातेवाईक तसेच उपचारार्थ दाखल रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक कोरोनाबाधित आढळलेले आहेत. संबंधित परिचारिकेला क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. ती निवृत्त तहसीलदारांकडे भाड्याने राहत असून तिला पती व दोन लहान मुले असल्याची माहिती आहे. 

एसआरपीएफ कंपनी मोझरीला क्वारंटाइन

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट मालेगाव येथून बंदोबस्त करून परतलेल्या राज्य राखीव पोलिस दल बलगट क्रमांक-9 अमरावतीच्या एका कंपनीला (सुमारे शंभर व्यक्ती) मोझरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

डॉक्‍टरांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध

स्थानिक रुक्‍मिणीनगर येथील कोरोनाबाधित 65 वर्षीय व्यक्तीचा चार जूनला नागपूर येथे मृत्यू झाला होता. संबंधित व्यक्तीवर रुक्‍मिणीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या कुटुंबातील एक सदस्य डॉक्‍टर आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. याच साखळीतून दस्तूरनगरनजीकच्या प्रतापगड कॉलनीतील एका महिलेसह तिच्या कुटुंबातील सदस्यांचे रविवारी (ता. सात) थ्रोट स्वॅब घेण्यात आले. संबंधित परिचारिका महिला आजारी असल्याचे सांगण्यात येते. 

नागपुरातही पुरुषाचा मृत्यू

नागपुरातही दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी महिलेचा तर सोमवारी पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील मृतांची संख्या 15 झाली आहे. मृतांच्या बाबतीत नागपूर आता अमरावतीची बरोबरी करतो की काय अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com