Amravati crime news latest update
esakal
अमरावती : चार अपत्य असलेल्या व्यक्तीने एका महिलेशी जवळीकता साधून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एकदा तिचा गर्भपातही केला. शिवाय तिचे बनावट विवाह प्रमाणपत्र व आधारकार्ड तयार करून दुरुपयोग करण्यात आला, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. दिगंबर ऊर्फ अर्जुन राघोजी अवथळे (वय ३५), असे अत्याचार, मारहाण व धमकी देऊन गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे, अशी माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.