esakal | अमरावती : नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू; सिकलसेल विभागाविरुद्ध रोष
sakal

बोलून बातमी शोधा

death

अमरावती : नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू; सिकलसेल विभागाविरुद्ध रोष

sakal_logo
By
मोहन गायन

जामली (जि. अमरावती) : सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गौलखेडाबाजार येथे घडली. मुलीचा मृत्यू कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच झाल्याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे.

चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र सलोना अंतर्गत येत असलेल्या गौलखेडाबाजार येथील मानवी पाटणकर या नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला मेळघाटातील आरोग्य विभागाच्या सामुदायिक अधिकाऱ्यांसह सिकलसेल कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही मुलगी सिकलसेलग्रस्त होती. याचा तपासणी अहवाल चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयाने 23 ऑक्टोबर 2017 रोजी दिला. मात्र सिकलसेल विभाग ती सिकलसेलग्रस्त होती हे मानायला तयार नाही. जर मानवी वाहक होती तर तिचा तपासणी अहवाल सिकलसेलग्रस्त असल्याचा दिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर मुलीला वाहक मानून सिकलसेल कर्मचाऱ्यांकडून या मुलीच्या उपचाराकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे. या मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी आई-वडिलांसह ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: राळेरासमध्ये साजरा झाला अनोखा 'ट्रॅक्टर पोळा'!

सदर मुलगी ही सिकलसेलग्रस्त नव्हती तर वाहक होती. त्यामुळे तिला शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नव्हता. मात्र स्थानिक डॉक्टरांनी व सिकलसेल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक होते.

- गोकुल ठाकूर, जिल्हा व्यवस्थापक, सिकलसेल, अमरावती

दोषींवर कारवाई करावी

माझी मुलगी सिकलसेल आजाराने ग्रस्त असल्याचे कार्ड दिले होते. कार्ड दिल्यापासून एकदाही कर्मचारी घरी आले नाहीत. त्यामुळे या आजारासाठी काय करावे लागते आम्हाला माहीत नव्हते. कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सांगितले असते तर आज आमची मुलगी जिवंत असती. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित मुलीचे वडील मनोज पाटणकर यांनी केली आहे.

loading image
go to top