

Amravati
esakal
अमरावती: यंदा मॉन्सूनचे आगमन विलंबाने होणार असल्याने पेरण्यांचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यात अद्याप पाऊसच झाला नसल्याने पेरण्यांना प्रारंभ होऊ शकलेला नाही. सोयाबीन पेरणीचा काळ कोरडा जाऊ लागला आहे. यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस होण्याची व तीसुद्धा खंडित स्वरूपाची राहणार असल्याने शेतीवरील संकट गडद होऊ लागले आहे. दरम्यान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.