esakal | डेंगी अमरावतीत, मच्छरदाण्या नागपुरात धूळखात
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

डेंगी अमरावतीत, मच्छरदाण्या नागपुरात धूळखात

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मच्छरदाण्या लाभदायक ठरत असताना सहा महिन्यांपासून मच्छरदाण्या नागपूर येथील हिवताप विभागाच्या कार्यालयात धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेंगी अमरावतीत तर मच्छरदाण्या नागपुरात असल्याची स्थिती आहे.

राज्यात डेंगी, हिवतापाचा प्रकोप वाढू नये, यासाठी शासनस्तरावर उपाययोजना म्हणून काही वर्षांपूर्वी मच्छरदाण्या वाटप करण्यात येत होत्या. मात्र, आता दोन वर्षांपासून शासनाकडून मच्छरदाण्यांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे डेंगी, हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. शासनाकडून यावर्षी मच्छरदाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय सध्या कागदावरच दिसून येत आहे. वाटप करण्यासाठी आलेल्या मच्छरदाण्या या नागपूर येथे हिवताप विभागाच्या कार्यालयात सहा महिन्यांपासून पडून आहेत.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

जिल्ह्यात गावागावांत दररोज डेंगीचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. याकडे शासनाच्या हिवताप विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

अकोला विभागातील पाच जिल्ह्यांसाठी मच्छरदाण्या आल्या आहेत. मात्र, त्या नागपूरच्या कार्यालयात आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मच्छरदाण्या पोहोचविण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद केली नव्हती. परंतु, यावर्षी खर्चाची तरतूद केली आहे. लवकरच मच्छरदाण्या पाचही जिल्ह्यांना वाटप करण्यात येतील.

- डॉ. कमलेश भंडारी, अतिरिक्त उपसंचालक, हिवताप विभाग, अकोला.

loading image
go to top