

Fire Breaks Out in Newborn Intensive Care Unit
esakal
Amravati District Women’s Hospital Fire What Happened? : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) ही आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे.