Fire Audit Delayed Due to Lack of Funds
esakal
महापालिकेने वारंवार सूचना दिल्यानंतरही जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागातील फायर ऑडिट करण्यात अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (ता. २४) घडलेल्या अग्नीकांडाच्या घटनेनंतर समोर आला आहे. या विभागातील अग्नीशमन यंत्राच्या नूतनीकरणाची मुदत २१ ऑगस्टलाच संपली होती व त्यापूर्वीच १७ ऑगस्टला सूचना देण्यात आली होती. मात्र निधी नसल्याचे कारण समोर करून सार्वजनिक बांधकाम विभागाने ते केले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनीही यासाठी संबंधित विभागास पत्र दिले होते.