
3.8 Magnitude Earthquake Hits Amravati:अमरावती जिल्ह्याला बुधवारी रात्री दहा वाजता भूकंपाचे धक्के बसले. धारणी तालुक्यातल्या शिवझिरी इथं भूकंपाचं केंद्र होतं. मेळघाटातल्या धारणी तालुक्यात सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू गावांच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कोणतीही जिवित किंवा वित्त हानी झाली नाहीय. बुधवारी रात्री १० च्या सुमारास ३.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.