Power Theft: मीटरमध्ये हेराफेरी करून पावणेपाच लाखांची वीजचोरी; वाढत्या गैरप्रकाराचा प्रामाणिक ग्राहकांना फटका
Amravati News: अमरावतीत महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून तब्बल ४ लाख ७५ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. मीटरमध्ये हेराफेरी करून नागरिकांकडून वीजचोरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अमरावती : नागपुरीगेट हद्दीत महावितरणच्या थातूरमातूर कारवाईनंतरही अवैध वीजचोऱ्यांना ब्रेक बसलेला नाही. अनेकांनी मीटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी सुरूच ठेवली. दोघांनी चार लाख ७५ हजार २० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले.