Scene from Amravati’s Walgav substation after angry youths set it on fire due to repeated power outages : सततच्या वीजखंडितीमुळे संतप्त झालेल्या दोन तरुणांनी चक्क वीज उपकेंद्र पेटवले आहे. तसेच त्यांनी कर्तव्यावर असलेल्या ऑपरेटरला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. ही घटना अमरावती ग्रामीण डिव्हिजनच्या भातकुली सबडिव्हीजन अंतर्गत वलगाव उपकेंद्रात घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.