Amravati: तोतया बँक अधिकाऱ्यांनी वृद्धाची शेती केली हडप
Fake Bank Officials Booked for Land Fraud: अमरावती जिल्ह्यात बँक अधिकारी असल्याचे भासवून एका वृद्धाची २५ लाख रुपयांची शेती फसवणुकीने खरेदी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अमरावती: आपणच बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करून चक्क एका वृद्धाची लाखो रुपयांच्या शेतीची खरेदी करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. नंदकिशोर रामप्रसाद शर्मा (वय ६२, रा. गणोरी, ता. भातकुली), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.