esakal | अमरावती : शेतात वीज पडली; दहा जण थोडक्यात बचावले
sakal

बोलून बातमी शोधा

farm

अमरावती : शेतात वीज पडली; दहा जण थोडक्यात बचावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना हिवरखेड नजीक घडली. शेतात वीज पडल्याने शेतकरी व शेतमजूर असे दहा जण बाल बाल बचावले. मात्र, शेतातील सिंचन साहित्य, मोटार व विद्युत जोडणीसह मीटर जळून खाक झाले.

मागील काही दिवसांपासून हिवरखेडसह संपूर्ण जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. त्यातच विजांचा प्रचंड कडकडाटसुद्धा सुरू होता. ता. ७ सप्टेंबर रोजी पावसाने थोडी विश्रांती घेतल्‍याने शेतकरी गणेश रेखाते हे दहा मजुरांसह संकट मोचन हनुमान मंदिर नजीकच्या मोराडी परिसरात आपल्या शेतात टोमॅटो पिकाची लाकडी काड्यांनी बांधणी करीत होते.

हेही वाचा: देशाच्या केंद्रस्थानी होणार मोठा फ्रिडम पार्क, 'या' ऐतिहासिक वस्तूंचा समावेश

मीटर घराजवळ काठ्यांची साठवण केलेली होती. तेथून सर्व मजूर काठ्या घेऊन जात होते आणि पिकांची बांधणी करीत होते. तेवढ्यातच दुपारी एक वाजेच्या दरम्यान वातावरण बदलले आणि पुन्हा जोरदार मेघगर्जनेसह तुफान वारा वादळ पाऊस सुरू झाला. त्यातच विजांचा प्रचंड कडकडाट सुद्धा सुरू झाला. एक मोठी वीज विद्युत खांबा जवळ कोसळली. ज्यामध्ये विद्युत खांब निकामी झाले. मीटर घर, सर्व्हिस लाईन, बोरवेल मशीन, इलेक्ट्रिक केबल, इत्यादी साहित्य स्वाहा झाले. शेतकऱ्याचे आणि महावितरणचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून, शासनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी, मागणी त्यांनी केली आहे.

शेतात वीज पडल्यावरही आम्ही सर्व जण थोडक्यात बचावलो. ही ईश्‍वराची कृपा आहे. परंतु, बोअरवेल मशीनसह जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

- गणेश रेखाते, शेतकरी, हिवरखेड.

loading image
go to top