esakal | देशाच्या केंद्रस्थानी होणार मोठा फ्रिडम पार्क, 'या' ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

freedom park

देशाच्या केंद्रस्थानी होणार मोठा फ्रिडम पार्क, 'या' ऐतिहासिक वस्तूंचा समावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महामेट्रो (maha metro) झिरो माईल स्टेशन (zero mile station nagpur) परिसरात चाळीस हजार चौरस फूटमध्ये फ्रिडम पार्क (freedom park nagpur) तयार करीत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त महामेट्रो या पार्कच्या माध्यमातून देशाच्या व शहराच्या इतिहासाला उजळणी देणार आहे. येथे हेरिटेज वॉल, वॉर ट्रॉफी टी-५५ बॅटल टॅंक आदी राहणार असून पार्कचे काम वेगाने सुरू आहे.

हेही वाचा: एसटी प्रवाशांचा खिसा होणार खाली, लवकरच होणार दरवाढ

झिरो माईल परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या परिसरात सीताबर्डी किल्ला, केंद्रीय संग्रहालय, रिझर्व्ह बॅंक आणि देशाचे केंद्र बिंदू, असा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे महामेट्रो नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी फ्रिडम पार्कचे काम गतीने करीत आहे. आतापर्यंत दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर परिसरात झाडे दिसून येत आहे. डाव्या बाजूने मोठे ॲॅंपीथिएटर आहे. शहीद स्मारकापर्यंत असलेली ऐतिहासिक भिंत, याशिवाय टी-५५ ही भारतीय लष्कराला सेवा देणारे टॅंक ठेवण्यात आली असून भारतीय ध्वज साकारण्यासाठी तीन स्तरीय पाण्याचा कारंजा तयार करण्यात आला आहे. विविध युद्धांमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणून मिळालेली ट्रॉफी संरक्षण मंत्रालयाने महामेट्रोला दिली आहे. ती ट्रॉफी येथे दिसणार आहे. याशिवाय टी-५५ हे दुसऱ्या महायुद्धात रशियाने तयार केलेले टॅंकही लक्षवेधक ठरणार आहे. भारतीय सैन्यांनी या टॅंकचा १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात वापर केला होता. याशिवाय हेरिटेज वॉलवर स्वातंत्राच्या पहिल्या युद्धापासून ते १९४७ स्वातंत्र मिळण्यापर्यंत नागपूर शहराशी संबंधित असलेल्या घटना दर्शविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त झिरो माइल स्टोन, शहराची स्थापना आणि सीताबर्डी किल्ल्याचा इतिहासदेखील जिवंत होणार आहे. ॲंपीथिएटर परिसरात शहराच्या इतिहासाच्या संबंधित सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय फ्रिडम पार्कमध्ये १८५७ ते १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र लढ्याच्या तीन कमानी लावण्यात येणार आहे.

आकर्षक रोषणाई वेधणार लक्ष -

या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी मेट्रोचे व्हायडक्ट उजळून निघणार आहे. येथे बसण्यासाठी मोठी जागा असल्याने नागरिकांना हे दृश्य मोहित करणारे ठरणार आहे. याठिकाणी मेट्रो कोचच्या प्रतिमेचे माहिती केंद्रही राहणार आहे. लागून असलेल्या जुन्या ब्रिटिश रेसिडेन्सी हेरिटेज इमारतीही नागरिकांना बघण्यास मिळणार आहे.

loading image
go to top