Vidarbha News:मित्राला बांधून ठेवत मैत्रिणीवर अत्याचार; लूटमारीचाही आरोप : कटात सहभागी पाच जणांना अटक

Gang Assault in Fraserpura, Amravati: अमरावतीत फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत जंगलात मित्राला बांधून ठेवत १८ वर्षांच्या युवतीवर अत्याचार झाला. पाच जणांना सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

अमरावती: फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत जंगलामध्ये निर्जनस्थळी फिरायला गेलेल्या एका जोडप्याला सात जणांनी अडविले. त्यानंतर जंगलाच्या आत नेऊन मित्राला बांधून ठेवल्यावर त्याच्या मैत्रिणीवर एकाने अत्याचार केला. या धक्कादायक घटनेमुळे पोलिस प्रशासन हादरले.

फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणात पाच जणांविरुद्ध सामूहिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यापैकी पाच जणांना अटक केली आहे, असे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी घटनेनंतर रविवारी (ता. २९) फ्रेजरपुरा ठाण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. ज्यांना अटक केली त्यांची नावे उघड करण्यात डीसीपींनी नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com