Amravati Gas Agency Scam
esakal
अमरावती : घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरण प्रणालीत पारदर्शकता असल्याचा दावा कंपन्यांकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात मात्र एजन्सींकडून ग्राहकांच्या नावाचा वापर करून मोठा गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. गोसावी कॉलनी येथील एका ग्राहकाने सिलिंडर बुक केले नसतानाही, त्यांच्या नावे परस्पर बुकिंग करून ते दुसऱ्याच व्यक्तीला डिलिव्हर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.