

Amravati News
esakal
अमरावती: शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या तीन शेतकऱ्यांच्या विहिरी अचानक गायब झाल्या. त्या गावात नाहीत, प्रत्यक्ष शेतामध्ये सुद्धा नाहीत. हा अफलातून प्रकार अमरावती जिल्ह्यातील शेवती जहाँगीर गावात उघडकीस आला आहे. आता याप्रकरणी संतप्त महिला शेतकऱ्यांनी विहीर चोरी गेल्याची तक्रार नांदगावपेठ पोलिस ठाण्यात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.