Amravati Crime : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन अपहरण
Crime News : अमरावती जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत, आरोपीने मुलीच्या आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर अत्याचार केले.
अमरावती : जिल्ह्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी एकीच्या आईवडिलांस झोपेच्या गोळ्या देऊन तिचे अपहरण करून अत्याचार करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे.