अमरावतीच्या IAS अधिकाऱ्याचा जबलपुरात डंका! भंगार बसेसचा केला असा कायापालट की, CM...

swapnil wankhede ias
swapnil wankhede ias

अमरावती : अधिकाऱ्यांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याचे जिवंत उदाहरण जबलपूर येथे पाहायला मिळत आहे. खूद्द मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या उपक्रमाची दखल घेत प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. स्वप्निल वानखडे, असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव. विशेष म्हणजे श्री. वानखडे हे मूळचे अमरावतीचेच आहेत.

swapnil wankhede ias
Amravati Accident: धामणगावातील सिमेंट रस्त्यांवर पडल्या भेगा! दुचाकी चालकांचे अपघात

कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आयएएस झालेल्या या युवा अधिकाऱ्याने जबलपूरच्या महापालिकेत आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून विविध उपक्रमांच्या माध्यमाने या शहराला अधिक सुंदर व स्वच्छ करण्याचा जणू विडाच उचलला आहे. (Latest Marathi News)

जबलपूरला जुन्या बसेस भंगार म्हणून पडल्या होत्या आणि त्याचा कोणताही उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्याचा उपयोग करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग करणे सुरू केले. त्याचा उपयोग प्रत्येक घटकाच्या नागरिकाला व्हावा, यासाठी कल्पकतेने विचार करून योजना साकारण्यात आली. त्यातूनच बस्ती पुस्तकालयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलण्यात येत आहे.(Marathi Tajya Batmya)

swapnil wankhede ias
ShivSena Advertisement: जाहिरात देणारा 'तो' हितचिंतक कोण?; अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची खैरात

नर्मदा नदीच्या घाटावर महिलांसाठी चेंजिंग रूमचा प्रश्न होता. कारण घाटावर बांधकाम करता येत नाही. त्यामुळे बसचा वापर करण्यात आला. बाहेरून येणारे जे गरीब पर्यटक असतात त्यांना राहण्यासाठी पण आता जुन्या बसमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. एक बस आता पोलिस चौकीसाठी पण बनविली आहे. जेथे पोलिस चौकी नाही, तेथे ही बस पोलिस चौकी म्हणून काम करणार आहे.

मूळचे अमरावतीचे स्वप्निल वानखडे यांनी येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर बीडमध्ये त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. श्री. वानखडे यांनी जबलपूरमध्ये केलेले नवनवे प्रयोग तसेच त्यांनी दाखविलेली कचऱ्यातून कला कौतुकाचा विषय झाली आहे.

जबलपुरात होऊ शकते, अमरावतीत का नाही

अमरावती शहरातील नागरिकांच्या तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जाऊ शकतात. जबलपूर येथे भंगार बसेसचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी होऊ शकतो तर अमरावतीत असे प्रयोग का होत नाहीत, असा प्रश्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com