

Amravati Irwin Hospital
esakal
अमरावती: कुठलीही व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरचा वापर न करता दोन चिमुकलींना रक्त लावलेल्या पिशव्या हाती घेऊन त्यांच्या माता बालरोग कक्षापर्यंत चालत गेल्याचा धक्कादायक व तितकाच गंभीर प्रकार मंगळवारी (ता.१) दुपारच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दृष्टीस पडला. जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिशुअतिदक्षता विभागात झालेल्या जळीत प्रकरणानंतर सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन जागे झाले नसल्याचे हे जिवंत उदाहरण दिसून येते.