

Irwin Hospital Amravati Faces Bed Shortage Patients Treated on Floor While Poor Infrastructure Raises Health Concerns
sakal
-सुधीर भारती
अमरावती: जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभागात झालेल्या व्हेंटिलेटर स्फोटानंतर तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळपणावर टीका केली जात आहे. विभागीय मुख्यालयाचे शहर असलेल्या अमरावतीमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाची अवस्थाही फारशी वेगळी नसल्याचे चित्र ‘सकाळ’च्या टीमकडून करण्यात आलेल्या पाहणीतून पुढे आले.