

Amravati Irwin Hospital
esakal
अमरावती: डफरिनच्या जळीत प्रकरणानंतर सर्वांच्या नजरा आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) सोयीसुविधांकडे वळल्या आहेत, मात्र या प्रकरणातूनही इर्विन प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना येथे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. एका वॉर्डात पुरुष तसेच महिलांसाठी स्वतंत्र असे प्रसाधनगृह आहे. मात्र ते आता तोकडे पडू लागले आहे.