Amravati IT Engineer Murder Case
esakal
अमरावती : शहरातील गजानन प्लाझा अपार्टमेंटमधील आईच्या हत्येच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. आईची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप असलेल्या तुषार सतीश कानफाडे (वय ३९) याला एका विदेशी कंपनीकडून वर्षाला २० लाख रुपयांचं पॅकेज मिळत होतं, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तुषारच्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.