Amravati: नामांकनाचा आज शेवटचा दिवस; थेट लढतीचे संकेत ; १७ दिवसांनी मतदान
Last Day for Filing Nominations in Legislative Council Election: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान होत असून सोमवारी ( एक जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सोमवारी या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे.