

Amravati News
sakal
अमरावती : जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांकडून तब्बल ९१ हजार ९९६ जणांनी कर्ज घेतले असून ही रक्कम १३० कोटी रुपयांच्या घरात आहे. सावकारांकडून प्रामुख्याने बिगरशेती कर्जवाटप करण्यात येत असला तरी या कर्जदारांमध्ये अधिक प्रमाण अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह बॅंकांनी नाकारलेल्या कर्जदारांचा समावेश आहे.