Amravati Man-Eating Tigress Dies After Tranquilization
esakal
अमरावती चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे रविवारी युवतीला, तर सोमवारी शिरजगावकसबा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला झडप घालून ठार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला वनविभागाने सुरू केलेल्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी ट्रँक्विलायझर गनचा वापर करून जेरबंद केले. त्यानंतर उपचारासाठी नागपूरला हलविताना वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी दिली आहे.