Underage Pregnancy Shocks Melghat
esakal
अमरावती : जिल्हा प्रशासनाने बालविवाहमुक्त जिल्हा ही संकल्पना साकार करण्याचे ठरविले असले तरी, अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादल्या जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मेळघाटात दोन अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादल्या गेल्याची घटना उजेडात आली आहे. जिल्ह्यातील आदिवासीबहूल चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यात असे प्रकार सातत्याने मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे.