Amravati MLC Poll Row :
ESAKAL
अमरावती : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अचानक आजारी पडणे व आयसीयूमध्ये असताना प्रसार माध्यमांना मुलाखती देणे, यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. उमेदवार मॅनेज झाला असल्याचा त्यांचा आरोप असून यामध्ये १५ ते २० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कोट्यवधींचा व्यवहार होत असताना शासन काय करते, असा संतप्त सवाल माजी मंत्री तथा निरीक्षक यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. तर आता कॉंग्रेसने वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारास समर्थन द्यावे, अशी मागणी समोर आली आहे.