पेट्रोल नाही म्हणून मुंबईला जाणारी उड्डाणं रद्द; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अमरावती विमानतळाचा भोंगळ कारभार!
Flight Cancelled : बेलोरा विमानतळावर विमानाला इंधन भरण्यासाठी आलेला टँकर मातीत अडकला, त्यामुळे अमरावती-मुंबई विमानफेरी रद्द करण्यात आली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला आणि त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला.
अमरावती : विमानामध्ये पेट्रोल भरणाऱ्या टँकर बेलोरा विमानतळावरील मातीत फसल्याने सोमवारी अमरावती ते मुंबई विमान फेरी ऐनवेळी रद्द करण्यात आली. यामुळे त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.