

Amravati
esakal
अमरावती: चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी असलेल्या ९३ कोटी रुपयांपैकी एक एप्रिल ते ३१ मे, या कालावधीत केवळ ३.२५ कोटी रुपयांची वसुली होऊ शकली आहे. हा आकडा महापालिका प्रशासनासाठी चिंताजनक असून मुख्य आर्थिक स्रोत खालावत असल्याने उद्भवणाऱ्या गंभीर संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता कर वसुलीसाठी कठोर व परिणामकारक पावले उचलण्याचे निर्देश मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी कर विभागास दिले आहेत.