
आता उमेश कोल्हेंच्या घराबाहेर राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण!
अमरावती : भाजपच्या निलंबित प्रवक्ता नुपूर शर्माचे समर्थन केल्याप्रकरणी हत्या झालेले केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने 15 जुलैपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्याचवेळी या प्रकरणात राणा दाम्पत्याने देखील अक्रमक भूमिका घेतली आहे. (Amravati murder case navneet-rana ravi rana recited hanuman chalisa in temple outside umesh kolhe house)
आज खासदार नवनीत राणा आणि रवी राणा अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या घरासमोरील मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच यावेळी नवनीत राणा यांनी कोल्हे यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली. अमरावतीतील दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि कोल्हे कुटुंबीयांना हा हल्ला सहन करण्याची ताकद मिळावी यासाठी कोल्हे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले.
राणा दाम्पत्याने रविवारी मृत उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. खासदार नवनीत राणा यांनी कोल्हे यांच्या मुलाला वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसेच नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांवर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. कोल्हे यांच्या हत्येपासून अमरावतीतील काही लोकांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला होता.
हेही वाचा: मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? CM शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले...
54 वर्षीय केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून घटनेचा तपास NIA करत आहे. उमेश कोल्हे यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली होती.
हेही वाचा: शरद पवारांवर महाजनांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'त्यांना माहिती होतं...'
Web Title: Amravati Murder Case Navneet Rana Ravi Rana Recited Hanuman Chalisa In Temple Outside Umesh Kolhe House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..