Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या
Knife Attack: अमरावतीतील विलासनगर येथे तिघांनी चाकूने वार करून २४ वर्षीय युवकाची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची माहिती. घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या युवकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अमरावती : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका युवकाची चाकूने वार करून हत्या केली. बुधवार, (ता. १९) नोव्हेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास गाडगेनगर हद्दीतील विलासनगर येथे घडली.