Amravati : नायब तहसीलदाराला लाच घेताना पकडले

तहसीलदारांना १८ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले
Amravati froud news
Amravati froud newsesakal
Updated on

अचलपूर : येथील तहसील कार्यालयात सोमवारी (ता.१७) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत नायब तहसीलदारांना १८ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

Amravati froud news
Amravati : जामडोल येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

शंकर श्रीराव असे त्या नायब तहसीलदाराचे नाव असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले. संबंधित नायब तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वी एक वाळूचे वाहन पकडले होते. कारवाई टाळण्यासाठी संबंधितांकडे २० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली होती.

Amravati froud news
Amravati : सरपंच, पॉलिटिकल आयकॉन्सच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

त्यावरून एसीबीच्या पथकाने आज येथील तहसील कार्यालयात सापळा लावला. सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास १८ हजार रुपयांची लाच घेताना नायब तसहीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

anti corruption buro, solapur
veterinary officer corruption allegations
Jalgaon
Amravati
Marathi News Esakal
www.esakal.com