Amravati Police Investigate Alleged Attempt to Sell a Newborn Baby Following a Minor Girl’s Delivery
esakal
अमरावती,: अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिचे बाळ महिला डॉक्टरांनी साडेतीन लाखांत विक्रीचा घाट घातल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे संशयित महिला डॉक्टर, तिचा पती व अल्पवयीन मुलीचा विधिसंघर्षित प्रियकर, अशा तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यामुळे शहरात घडलेल्या या खळबळजनक घटनेनंतर महिला डॉक्टर पतीसह पसार आहेत.