Amravati Crime : माझी हो...अन्यथा जाळून मारेल! एकतर्फी प्रेमप्रकरणातून १० वीच्या विद्यार्थिनीला धमकी; परीक्षा केंद्रासमोरच राडा

Youth Threatens 10th Class Girl Over One-Sided Love : एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका संशयित युवकाने शालेय विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रासमोरच धमकी दिल्याची घटना शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
Youth Threatens 10th Class Girl Over One-Sided Love

Youth Threatens 10th Class Girl Over One-Sided Love

esakal

Updated on

अमरावती : तू माझ्यासोबत लग्न कर, माझीच हो अन्यथा तुला जाळून मारेल, अशी धमकी एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका संशयित युवकाने शालेय विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रासमोरच दिल्याची घटना शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वंश मोहड (वय २३), असे धमकी देणाऱ्या संशयित युवकाचे नाव असून, त्याला दुसरा संशयित राहुल मेश्राम (वय २१) यानेही सहकार्य केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. त्या आधारे पोलिसांनी संशयित दोघांविरुद्धही अडवणूक, विनयभंग, मारहाणीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, असे राजापेठ पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com