अमरावती - परतवाडा-बैतुल मार्गावर भीषण अपघात, ६ जण जागीच मृत्यू

या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
accident news
accident news
Summary

या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शिरजगावकसबा : परतवाडा ते बैतुल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले असून, एक गंभीर जखमी आहे. परतवाडावरून बोदड मार्गाने जात असताना अनियंत्रित कारने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहने पंधरा फूट खोल नाल्यात आदळली. रविवारी (ता. १७) रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.

accident news
अमेरिकन तरुणीच्या अपहरणाचा २४ तासांत छडा, कहाणी ऐकून दिल्ली पोलिस आवाक्

मिळालेली माहिती अशी की, या अपघातात पांडुरंग रघुनाथ शनवारे (वय ३०, रा. बोदड, ता. चांदूरबाजार), सतीश सुखदेव शनवारे (वय ३०, रा. बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (वय २५, रा. खरपी), रमेश धुर्वे (वय ३०, रा. सालेपूर), प्रतीक दिनेशराव मांडवकर (वय २६), अक्षय सुभाष देशकर (वय २६, रा. बोदड), अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश गीते यांनी सांगितले. तर संजय गजानन गायन (वय २२, रा. बोदड, ता. चांदूरबाजार) हा मजूर गंभीर जखमी आहे.

घडलेली घटना अशी की, जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. परतवाडा-बैतुल मार्गावर राजू चुन्नीलाल मानधने (रा. परतवाडा) यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. तेथे फक्त बांधकामासाठी लागणारे लोखंडाचे काम केल्या जाते. त्याच दुकानात आसपासच्या गावातील मजूर काम करतात. रात्री पाऊस सुरू असल्यामुळे चालक कारने मजुरांना घेऊन परतवाडा ते बोदड मार्गाने जात होता. निंभोरा गावाजवळ कारच्या समोर एमएच २७ एस ४६७० क्रमांकाची दुचाकी होती. वेगात असलेल्या कारचालकाने आधी दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकी १५ फूट खोल नाल्यात फेकल्या गेली. अनियंत्रित झालेली कारसुद्धा त्याच नाल्यात उलटली.

accident news
वासू सपना, प्रेमरोग, आशिकी; शिंदे-फडणवीसांवर सेनेची फिल्मी टीका

दरम्यान, या भीषण अपघातात कारमधील चौघे तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात संजय गायन हा गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी आधी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. अपघातात कारचा चालक रमेश धुर्वे सुद्धा ठार झाला.

शिरसजगावकसबा पोलिस रात्री पावणेबाराच्या सुमारास अपघातस्थळी दाखल झाले. रात्रीतूनच काही नागरिकांना मदतीला घेऊन कारमध्ये अडकलेल्या चौघांसह दुचाकीवरील दोघांचे मृतदेह काढण्यात आले. शिरजगावकसबा पोलिसांनी याप्रकरणात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती.

accident news
पक्षाचे आदेश झुगारून मविआचे आमदार मुर्मू यांना मतदान करतील - शेलार

कार नाल्यात उलटून दुसऱ्या काठावर गेली

कार आणि दुचाकी दोन्ही वाहने पंधरा फूट खोल नाल्यात उलटली. कारने पलट्या घेतल्यानंतर ही कार नाल्याच्या दुसऱ्या काठावर आपोआप फेकली गेली. अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com