Amravati News :अमरावतीत केबल चोरी करणाऱ्या टोळीची पोलिसांनी केली गडबड! १२ आरोपी जेरबंद
Cable Theft : अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात केबल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचप्रमाणे ७ गुन्ह्यांचा उलगडा करत १२ आरोपींना अटक केली आहे.
अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतातून केबल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.