Amravati police constable death
esakal
अमरावती : शहरातील तपोवन परिसरातील अंबिकानगर येथे पोलिस शिपायाने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना बुधवारी (ता. २१) उघडकीस आली. अमर तायडे (वय ३४) असे मृत पोलिस शिपायाचे नाव असून, ते अमरावती पोलिस आयुक्तालयांतर्गत गाडगेनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.