esakal | अमरावती : पोलिस पाटलांवर उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

police patil

अमरावती : पोलिस पाटलांवर उपासमारीची वेळ

sakal_logo
By
मोहन गायन

जामली (जि. अमरावती) : पोलिस पाटील हा जनता आणि पोलिसांमधील ( Police) महत्त्वाचा दुवा आहे. तो कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम गावपातळीवर अहोरात्र करीत असतो. पण, आजघडीला पोलिस पाटलांवरच उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नसल्याने बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पोलिस पाटील हा गावपातळीवर नेहमीच आपला जीव धोक्यात घालून पोलिस आणि जनता यांच्यामधील दुवा बनून काम करीत असतो. वेळोवेळी शासनाने नेमून दिलेल्या कामाची चोख अंमलबजावणी करीत असतो. कोरोनाकाळात पोलिस पाटलांची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. त्यांनी आरोग्य विभाग असो की महसूल विभाग, यामध्ये प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्य केले आहे.

हेही वाचा: डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

कोरोनाकाळात प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत. तसेच गावपातळीवरील तंटे मिटवणे, अपघाताच्या घटना घडल्यास पोलिसांना सहकार्य करणे, गावात गणपती असो की दुर्गा उत्सव असो की निवडणुकीत शांतता ठेवण्यासाठी तो आपली भूमिका चोखपणे पार पाडत असतो. अशा व्यक्तिमत्त्वाचे सहा महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन हा प्रश्न निकाली काढणे आवश्यक झाले आहे.

मानधनाअभावी आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शासनाने त्वरित हा मुद्दा निकाली काढून दर महिन्याला वेळेवर मानधन द्यावे.

- बब्बू अजनेरिया, जिल्हा उपाध्यक्ष, पोलिस पाटील संघटना

शासनाकडून कालच दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पोलिस पाटलांचे एप्रिल, मे व जून महिन्याचे मानधन येत्या आठ दिवसांत करण्यात येईल.

- किशोर शेंडे, कार्यालय अधीक्षक, ग्रामीण पोलिस, अमरावती.

loading image
go to top