esakal | डॉ. दिलीप मालखेडे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे.

हेही वाचा: मित्रांनीच केला मित्राचा खून; मृतदेहाचे तुकडे करून पुरले खड्ड्यात

डॉ. मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहे. माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ  १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे कुलगुरूपद रिक्त होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मात्र, डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची नियुक्ती झाल्याने कुलगुरू मिळाले आहे.

loading image
go to top