Amravati Crime: पाच देशीकट्टे व आठ काडतूस जप्त; दोघांना अटक, सणासुदीच्या दिवसांत गुन्हे शाखेची कारवाई
Illegal Weapons: अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रांची तस्करी सुरू असून, गुन्हे शाखेने बुधवारी दोन संशयितांना अटक करून पाच देशी कट्टे आणि आठ काडतूस जप्त केले आहेत. त्यांच्याकडून १.५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
अमरावती : शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध अग्निशस्त्रांची तस्करी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. तीन) दोघांना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीचे चार कट्टे जप्त करण्यात आली आहेत.