

Amravati
esakal
अमरावती: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसासोबत बारीक गारही पडली. सुमारे तासभर पावसाचा जोर होता. या पावसाने वातावरणातील उष्मा कमी करण्यासोबतच गारवा निर्माण केल्याने गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.