

Amravati Rainfall
esakal
अमरावती: जुलैच्या अखेरीस झालेल्या धुव्वांधार पावसाने या महिन्यात विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून धरणे अद्याप पूर्णतः भरलेली नाहीत. मोठे, मध्यम व लघुप्रकल्पांत ५५ टक्के जलसाठा झाला आहे. नदी-नाल्यांचेही पात्र पुरेसे भरलेले नाहीत.