

Author Indrajit Bhalerao views nature and bird photographs captured by Dr. Rishi Gadge at the Shabdvel State-Level Literary Conference in Amravati
esakal
अमरावती : निसर्गातील विविध रंग, पक्ष्यांचे मनमोहक रूप आणि वन्यजीवनातील अनोखे क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची कला छायाचित्रकाराला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाते. अशाच निसर्गप्रेमातून आणि पक्ष्यांच्या अभ्यासातून साकारलेल्या सुंदर छायाचित्रांचे प्रदर्शन अमरावती येथे आयोजित सहाव्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांनी साहित्यप्रेमींसह मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध लेखक इंद्रजित भालेराव यांनीही या प्रदर्शनाला भेट देत छायाचित्रे निरखून पाहिली.