अमरावतीमधील कारागृह निरीक्षकाच्या मुलावर हडपसर येथे वार करुन खुन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुन

अमरावतीमधील कारागृह निरीक्षकाच्या मुलावर हडपसर येथे वार करुन खुन

पुणे: अमरामवती येथे नियुक्तीस असलेल्या एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या मुलावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे घडली. याप्रकरणी तरुणीसह पाच जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीधर उत्रेश्‍वर गायकवाड (वय 21, रा. गोपळपट्टी पार्क साई टॉवर, मांजरी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गिरीधरचा भाऊ निखिलकुमार गायकवाड (वय 27) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका तरुणीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीधरचे वडील उत्रेश्‍वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कारागृह निरीक्षक म्हणून काम करीत आहेत.

गिरीधर मंगळवारी रात्री दहा वाजता त्याच्या घरी बसला होता. त्यावेळी त्याला एक फोन आल्यानंतर तो घराबाहेर जाऊ लागला. त्यावेळी त्यास फिर्यादीने विचारणा केल्यानंतर तो, मैत्रीणीने बोलाविले असल्याने तिला भेडून येतो असे सांगून गेला. तो अर्धा तासानंतरही घरी न परतल्याने त्याच्या आई, भावाला काळजी वाटू लागली. त्याचवेळी त्याच्या वडीलांनी दोघांना गिरीधरचा खुन झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे व अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी पोचले. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

Web Title: Amravati Stabbed Death Hadapsar Son Prison Inspector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top