Amravati sexual assault case,
Sakal
अमरावती : महाराष्ट्र भ्रमणासाठी नातेवाइकासोबत अमरावतीत आलेल्या एका परप्रांतीय पर्यटक २४ वर्षीय युवतीवर एका संशयिताने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्यावर बळजबरीने अत्याचार केला. आयुक्तालयातील बडनेरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बडनेरा पोलिसांनी संशयित साहिल लस्कर (वय २०) या युवकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.